पवनानगर
पायी दिंड्याना वाहतूक पोलीसांकडून संरक्षण मिळावे अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
कार्तिकी एकादशी सोहळ्या निमित्त श्रीक्षेत्र आंळदी येथे कोकण व मावळ भागातून येणाऱ्या पायी दिंड्याना वाहतूक पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत लेखी निवेदन मावळ चे तहसीलदार मधूसुदन बर्गे,वडगांव मावळ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष ह.भ.प.शांताराम बोडके,कोषाध्यक्ष भरत वरघडे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, नगरसेवक अरुण भेगडे,सचिव लक्ष्मण तळवडे,प्रसिद्ध प्रमुख सचिन ठाकर,उद्वव कारके,गोरख घोजगे,गणेश घोजगे,शंकर मराठे,आत्माराम शिंदे,दिनकर निंबळे,शिवाजी राक्षे,बाबासाहेब गाडे,विजय गाडे,यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष शांताराम बोडके यांनी सांगितले की गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्गावरुन पायी वारीतील मावळ येथील जांभुळफाटा या ठिकाणी एका भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी ने दिंडीतील वारकऱ्यांचा आपघात झाला होता यामध्ये पाच वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. पायी वारी करत असताना भजन,श्री ज्ञानेश्वर महाराज च्या नामाचा जयघोष करत वारकरी रस्त्यावरुन जात असतात पंरतु कोणत्याही प्रकारची वाहतूक नियमाचे बदल केला जात नाही. यामुळे प्रत्येक पायी दिंडीच्या संरक्षणाना साठी वाहतूक पोलीसांनी योग्य ती नियमावली तयार करुन दिंड्याना वाहतूक पोलीसांचे संरक्षण मिळावे अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!