तळेगाव दाभाडे :
संतांचे विचार आणि कार्य हे आधुनिक जीवन जगण्यासाठी खूप उपयोगी पडत आहे असे प्रतिपादन जगतगुरू तुकाराम महाराज यांचे वंशज हभप अशोक महाराज मोरे यांनी केले.
  तळेगाव दाभाडे स्टेशन येथील विठ्ठल मंदिर देवस्थान यांच्या काकड आरती उत्सव सांगता सोहळयाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.    
  काकड आरती उत्सव सांगता समारंभ प्रसंगी पहाटे काकड आरतीने सुरुवात होऊन, सकाळी ग्रामप्रदक्षिणाने तळेगाव स्टेशन येथील तळयामध्ये काकड सोडून, नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. या वेळी उंट,घोडे, भव्य रथ अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व मुलांनी पारंपरिक वेश परिधान करून सर्वांनी फेटे परिधान केले होते. 
                नगर प्रदिक्षणेनंतर जगत गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज ह भ प अशोक महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्या नंतर उद्योगपती श्री गणेश काकडे यांचे हस्ते  महाआरती  संपन्न झाली.
या काकड आरती सोहळ्यासाठी तळेगाव येथील प्रसिद्ध उद्योजक व युवा नेते आशिष  खांडगे यांनी ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या वतीने पालखीचे स्वागत केले. या मिरवणुकीच्या रथाचे उद्घाटन केशव कुल, विजय पलंगे, संदीप शेळके व चेतन पवार यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादने झाली. यावेळी तळेगाव व पंचक्रोशीतील
भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल मंदिर देवस्थान  व रुख्मिणी महिला भजनी मंडळच्या वतीने सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

error: Content is protected !!