वडगाव मावळ:
दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य
यांच्या संयुक्त विद्यमाने डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेवराव शेलार यांना राजर्षी शाहू सरपंचरत्न पुरस्कार
व ग्रामरत्न पुरस्कार २०१२ देऊन गौरविण्यात आले.
बालदिनी १४ नोव्हेंबर २०२२.ला. नगरपालिका मंगल कार्यालय, नगर-पुणे रोड, शिरूर ता. शिरूर हा पुरस्कार सोहळा  पार पडला.
सुजाता पवार (जि.प.सदस्या, पुणे),कुसुम.मांढरे (जि.प.सदस्या, पुणे),राजेंद्र जगदाळे पाटील (जि.प.सदस्य, पुणे),स्वाती पाचुंदकर पा. (जि.प.सदस्या, पुणे),वैशाली वाखारे (माजी नगराध्यक्षा, शि.न.पा.), अॅड. कोरेकर काका (सभापती, कृ.उ.बा.स. शिरूर),आबासाहेब सोनवणे (शिरूर तालुकाध्यक्ष, भाजपा),मानसिंगभैय्या पाचुंदकर पा. ( संचालक, कृ.उ.बा.स. शिरूर), बाबुराव पाचंगे ( संपर्कप्रमुख, भाजपा शिरुर तालुका), रेखा.बांदल (जि.प.सदस्या, पुणे), अॅड. धर्मेंद्रजी खांडरे ( संघटन सरचिटणीस, भाजपा पुणे),सुनिता गावडे (जि.प.सदस्या, पुणे)
सविता बगाटे (जि.प.सदस्या, पुणे),मोनिकाताई हरगुडे (सभापती, पं.स. शिरूर),पंडित आप्पा दरेकर (सदस्य, जिल्हा नियोजन समिती, पुणे),शशिकांत दसगुडे (मा. सभापती, कृ.उ.बा.स. शिरूर),नितीन पाचर्णे (शिरुर शहराध्यक्ष, भाजपा , शेखर  पाचुंदकर पा. (मा.जि.प.सदस्य, पुणे) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर
अध्यक्ष, राजर्षी शाहू प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य संपादक, साप्ताहिक जागृत शोध यांच्या पुढाकारातून हा गौरव सोहळा पार पडला. सरपंच नामदेवराव शेलार यांनी बोरवली,कांब्रे गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला.
सरपंच शेलार यांचे गेल्या पंधरा वर्षांपासून डाहूली ग्रुप ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांच्या कालावधीत अनेक विकास कामे मार्गी लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवक अध्यक्ष पदापासून सरपंच शेलार यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. ग्रामपंचायतीचे सरपंच,विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व संचालक अशी त्यांचे राजकीय कारकीर्दचा चढता आलेख उभा राहिला. स्थानिक पातळीवरील विकास कामांना प्राधान्य देत ते जनसेवेचे काम अधिक नेटाने करीत आहे,या पित्यर्थ त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

error: Content is protected !!