तळेगाव दाभाडे:
तळेगाव शहर काँग्रेस कमिटीने ०८ नोव्हेंबर काळा दिवस म्हणून साजरा केला. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलना मधून बात केल्या आणि नोटबंदी केली .
या नोटबंदीनंतर भारताची अर्थव्यवस्था कोलमडली याच अनुषंगाने तळेगाव शहर काँग्रेस कमिटीने काळा दिवस साजरा केला.
प्रास्ताविक आनंद मोरे यांनी केले.अमर खळदे ,उत्तम ओसवाल, शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे  यांनी मोदी सरकार वर सडकून टीका केली. संकेत खळदे यांनी आभार मानले. भूषण खळदे ,ओंकार खळदे ,प्रभाकर ओंकार ,पंढरीनाथ मखामले, जितेंद्र कदम ,सौरभ खळदे, किरण मोकाशी ,अभिजित चौधरी, सचिन हक्के ,हेमंत वैरागी ,बाळासाहेब जाधव ,गणपत पिंगळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

You missed

error: Content is protected !!