तळेगाव दाभाडे:
मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या अध्यक्ष पदी तळेगाव दाभाडे येथील प्रदीप साठे यांची तर सचिव पदी लहु ढेरंगे यांची निवड करण्यात आली.
मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीची बैठक झाली या बैठकीत अन्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. उपाध्यक्ष पदी पांडुरंग तिखे,सहसचिव पदी उस्मान इनामदार,कोषाध्यक्ष पदी दिपक जयवंत,सहकोषाध्यक्ष पदी दतात्रय ढोरे,महिला उपाध्यक्ष पदी दिपाली गोकर्ण व आशा जैन यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ संपादक सुरेश साखवळकर यांची समितीचे सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.

You missed

error: Content is protected !!