मावळ फेस्टीवल २०२२ नूतन कार्यकारिणी जाहीर
वडगाव मावळ:
कला , क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना असलेल्या मावळ फेस्टीवल ची नूतन कार्यकारिणी संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदी किरण रघुनाथराव म्हाळसकर यांची व कार्यक्रम प्रमुखपदी अ‍ॅड.पवन सुरेशराव भंडारी यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष प्रविण चव्हाण , कार्याध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर , मावळते अध्यक्ष सागर जाधव , मावळते कार्यक्रम प्रमुख महेंद्र बा. म्हाळसकर , विवेक धर्माधिकारी , नामदेवराव ढोरे , नितीन कुडे , बाळासाहेब भालेकर , रविंद्र काकडे, जितेंद्र कुडे, शामराव ढोरे , प्रमोद म्हाळसकर , सुरेश जांभूळकर, अरुण वाघमारे, शैलेंद्र ढोरे, भूषण मुथा , शंकरराव भोंडवे, विनायक भेगडे , शेखर वहिले, दत्तात्रय लंके , सलीम तांबोळी संचालक उपस्थित होते.
मावळ फेस्टीवल चे हे १५ वे वर्ष असून डिसेंबर महिन्यात मोठ्या थाटामाटात हे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

error: Content is protected !!