आदिवासी बांधवाची झोपडी जळून खाक अनेकांनी दिला मदतीचा हात
टाकवे बुद्रुक:
मावळ तालुक्यातील राजपुरी गावातील आदिवासी कातकरी जमातीचे सतीश हिलम यांचे घर रविवारी रात्री जळुन खाक झाले ते कुटुंब उघड्यावर आल्याची मावळ सत्य लाईव्ह बुलेटीनने प्रसिद्धी केली याची तातडीने दखल घेत या कुटूंबाला अनेकांनी मदतीचा हात दिला.
टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे यांनी पन्नास किलो तांदूळ दिले. पिंपरी येथील गृहिणी सुनंदा निक्रड यांनी एक हजार रोख दिले.टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड यांनी किराणा कपडे आणि हिलम याचे छप्पर साकारायला पत्रे,खांब आणि अँगल देण्याची ग्वाही दिली. एव्हाना हे सगळे मटेरियल हिलम यांच्या जळालेल्या झोपडी पर्यत पोहचले आहे.
तर मावळ तालुक्या पासून कित्येक अंतर दूर  असलेल्या  संस्कार प्रतिष्ठानच्या सभासदांनी एका रात्रीत म्हणजे २४ तासाच्या आत या कुटूंबाला लागणारा किराणा ,गहु, ज्वारी, तांदुळ, विविध प्रकारच्या डाळी ,विविध प्रकारचे साबण, रवा, मैदा ,साखर ,चहा पावडर, मटकी ,वाटाणा, शेंगदाणे, तेल,बिस्किट पुडे ,तिखट ,मीठ,जिरी, मोहरी, हळद, अंथरुण, पांघरूण घेण्यासाठी चादर ब्लँकेट बेडशिटस ,वापरण्यासाठी भांडी ,बादली, ताट, तांबे, पातेली, ग्लास, कपबशी, तसेच नवीन साड्या पँट शर्ट ई साहित्य जमा करुन त्या कुटुंबाला आज देण्यात आले एक महिना पुरेल एवढे साहित्य दिले.
यासाठी डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नम्रता बांदल, रंजना जोशी, सुनिता गायकवाड ,तनुजा ताकवले, विजय आगम ,प्रभाकर मेरुकर ,मनोहर कड ,राहुल ढवळे, रंजना गोराणे यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!