टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील मानकुलीच्या मंदिर  बांधकामासाठी टाकवे बुद्रुकचे माजी उपसरपंच व टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपाचे अध्यक्ष रोहिदास राघूजी असवले यांच्या वतीने बांधकामासाठी विट देण्यात आली.
सार्वजनिक गणेशोत्सव गाव भेट  दौऱ्याच्या वेळी मानकुली येथील ग्रामस्थांनी येथील मंदिराचे  अर्धवट राहिलेले काम अनेक दिवसापासून तसेच पडून राहिले आहे.
ही बाब माजी सरपंच रोहिदास असवले यांच्या कानावरती तेथील स्थानिकांनी घातली होती. त्यानंतर असवले यांनी शब्द दिला जेवढी  विट बांधकामासाठी लागेल तेवढी माझ्याकडून पुरवली जाईल.
रोहीदास असवले यांनी दिलेल्या शब्दाला जागून विटाच्या मागणी प्रमाणे पहिल्या टप्प्यात  येथील मंदिराच्या राहिलेल्या अर्धवट कामासाठी ५०००  वीट दिली. गरज पडल्यास अजून वीट देण्याची ग्वाही देऊन  असवले यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.यावेळी ग्रामस्थ व तरूण मंडळी उपस्थित होती.

You missed

error: Content is protected !!