कामशेत:
त्या दोघी बावीस दिवस झाले दवाखान्यात बसून देवाचा धावा करीत आहे. एकीचा भाऊ आहे आणि दुसरीचा पती. एका अपघातात गंभीर रित्या जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहे. तो उपचाराला प्रतिसादही देतो. आता पुढे उपचार करायचे तर त्यांच्या पुढे आर्थिक विवेचना आहे. भावाच्या जीवासाठी बहीणीचा धावा सुरू आहे. तर पतीच्या रक्षणासाठी पत्नीचा जीव कासावीस झाला.
यंदाची दिवाळी या दोघींची दवाखान्यात गेली. गोळ्या,औषधे,स्लाईन आणि ऑपरेशन हे शब्द कानावर पडले आहे. त्यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू असलेल्याने ना भाऊबीज झाली ना,दिवाळी पाडव्याला पत्नीचे औक्षण झाले. एकीकडे धुमधडाक्यात दिवाळीचे सेलेब्रेशन सुरू असताना पांडुरंग पडवळ या तरुणाच्या उपचारासाठी नणंद भावजयेचा जीव कासावीस झाला.
माझ्या पतीच्या उपचारासाठी मदत करा असे सांगताना पांडुरंगची पत्नी सुरेखा हिचा कंठ दाटून आला होता.डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. थरथरत्या ओठांतून शब्दही फुटत नव्हते. तिच्या हदयाची घालमेल बघून,भावासाठी बहीणीचा टांगणीला लागलेल्या जीवाची ओढाताण पाहून मदतीचा हात कोणी पुढे करेल का?असा प्रश्न पडला आहे.
पांडुरंग पडवळ खेड तालुक्यातील धामणे गावचा शेतमजूर. कामानिमित्त कामशेत परिसरात आला होता.पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर त्याचा अपघात झाला. यात तो गंभीर रित्या जखमी आहे. अपघातानंतर त्याला तातडीने कामशेत येथील महावीर हाॅस्पिटल मध्ये दाखल केले. हाती असलेल्या पुंजीवर उपचार सुरू झाले 
पांडुरंग यांची आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्याचे सेवाभावी डाॅक्टर विकेश मुथा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मागील वीस दिवसांपासून या तरुणावर उपचार सुरू ठेवले आहे. परंतू आजमितीला पांडुरंग यांच्यावर पुढील उपचारासाठी महागड्या औषधांची,गरज पडल्यास शस्त्रक्रियेची अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचाराची गरज आहे. यासाठी आर्थिक खर्च अपेक्षित असल्याचे डाॅ.विकेश मुथा यांनी सांगितले.
पांडुरंग पडवळ हा शेतमजूर हाताला मिळेल ते काम करायचे आणि पोट भरायचे हीच त्याची कमाई.
त्याची आई अपंग असून त्याला सानिका,ओंकार,वैभव ही तीन अपत्ये आहे. पत्नी सुरेखा हिला तर पती शिवाय कोणाचाच आधार नाही. तीही पती सोबत मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवित आहे.पतीच्या अपघाताने ही माऊली पूर्णपणे हादरून गेली आहे. माझ्या नव-याच्या उपचारांसाठी मदत करा हे शब्द ही तिच्या कंठातून निघताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
तर पांडुरंग ची बहीण मंदा ही देखील बावीस दिवस झाले आहेत,भावाच्या उपचारांसाठी दवाखान्यात बसून आहे. ती सांगत होती,आम्ही दोघे बहीण भाऊ.भावाचा मला मोठा आधार आहे.आमची आई अपंग आहे. भावाच्या उपचारांसाठी मदतीचा हात द्यावा,जेणेकरून त्याच्यावर उपचार होऊ शकेल.
महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” पुढील उपचारासाठी आर्थिक मदत गरजेची आहे. आता पर्यत आम्ही कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टच्या निधीतून खर्च करू शकलो,यापुढे समाजातील दानशूरांनी मदत करावी ही विनंती आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर: 9822403422 phone pay नंबर 7218440003, गुगल पे नंबर 9822403422.

error: Content is protected !!