डबेवाल्यांनी आदीवासी बांधवांना मिठाई व कपडे वाटून दिवाळी साजरी
गडद:
दिवाळी म्हणजे आनंदाचा, मांगल्याचा सण हा सण साजरा करीत असताना आपण सर्वच आनंदाने आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी  वेगवेगळी खरेदी करीत असतो गोड पदार्थ, नवे कपडे, नवे साहित्य फटाके या सर्वांचीच आपल्याकडे रेलचेल असते .  पण आपण एकीकडे हा सण साजरा करीत असताना समाजातील पैलतीरावर दुसराही वर्ग राहत असतो जिथे दिवाळीचे दीप पेटलेच जात नाहीत. आपला आनंद साजरा करीत असताना सामाजिक दातृत्व म्हणून आपण या पैलतीरावरील लोकांनसाठी आयुष्यातील  अंधारातही एक दीप लावून खरी दिवाळी साजरी केली पाहीजे.
मुंबई डबेवाला असोशिएशन हे काम काही वर्ष अविरत पणे करत आले आहेत दिवाळीला  मुंबई डबेवाला असोसिएशनच्या वतिने डबेवाले आवर्जुन आदीवासी वाडी वस्तीवर जातात आणी आदिवासी बांधवांना मिठाई व कपड्यांचे वाटप करतात.
या दिवाळीत डबेवाल्यांनी पुणे जिल्ह्याती खेड तालुक्याच्या पश्चिम भागा मधिल ठाकरवाडी मध्ये जावून ठाकर बांधवांना गडद गावचे सरपंच रामभाऊ शिंदे यांचे हस्ते मिठाई व  कपड्यांचे वाटप केले. तसेच ठाकर भगिनींना भावबीज म्हणुन साडी व मिठाईचे वाटप आंबोली गावचे सरपंच शरद शिंदे यांचे हस्ते केले या वेळी मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर, डबेवाला रोटी फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास शिंदे ,पदधिकारी विठ्ठल सावंत, रोहीदास सावंत डबेवाले मुकादम कैलास महाराज शिंदे , उपस्थित होते.
आहे रे वर्गा कडे सर्व काही आहे तो वर्ग दिवाळी सण चांगल्या प्रकारे साजरी करू शकतो. पण नाहीरे वर्गाकडे काहीच नाही तो वर्ग दिवाळी साजरी करू शकत नाही त्या मुळे त्यांना ही दिवाळी साजरी करता आली पाहीजे ही भावना डबेवाल्यांन मध्ये निर्मांण झाली आणी त्यातुन २०१५ साला पासुन आम्ही हा उपक्रम चालू केला असल्याचे सुभाष तळेकर अध्यक्ष
मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी सांगितले.

error: Content is protected !!