साते मावळ:
येथील संकल्प सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने दिपावली निमित्त अहिरवडे येथील किनारा वृध्दाश्रम येथे अन्नदान करण्यात आले.तसेच साते गावातील अदिवासी समाजातील मुलांना कपडे आणि मिठाई वाटप करण्यात आले त्यावेळी  किनारा वृध्दाश्रमच्या  संचालिका प्रिती वैद्य  ,साते गावचे माजी उपसरपंच एकनाथ येवले, माजी उपसरपंच अनिल मोहिते, सिध्दार्थ मोरे,अशिष शिंदे,निखिल येवले उपस्थित होते.  संस्थेचे अध्यक्ष मारुती आगळमे, कार्याध्यक्ष वदन आगळमे ,उपाध्यक्ष शेखर गावडे, सचिव मदन आगळमे, सहसचिव नितीन आवटे, सहखजिनदार नितीन आगळमे, विश्वस्त दशरथ आगळमे, नवनाथ गावडे ,विलास आगळमे,बाळासाहेब नवघणे,नवनाथ शिंदे ,प्रकाश भुंडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
किनारा वृध्दआश्रमाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तर आकाश कंदिल लावले होते. साई बाबांच्या भक्तीमय भजनाने वातावरणात प्रसन्नता आली होती.
किनारा वृध्दआश्रमाच्या संचालिका प्रिती वैद्य म्हणाल्या,” आजचा दिवाळीचा दिवस आनंदाचा आणि उत्सव साजरा करण्याचा, या दिवशी संकल्प सामाजिक संस्थेने वृध्दआश्रमात हा सण साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली.
संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मारूती आगळमे म्हणाले,” संकल्प सामाजिक संस्थेच्या मार्फत कायम विधायक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते.दिवाळीचा हा सण साजरा करण्याची संधी किनारा वृध्दाश्रम व्यवस्थापनाने दिली. त्याबद्दल त्यांचे आभार.
साते गावातील कातकरी पाड्यावरील मुलांना दिवाळी निमित्त कपडे व मिठाईचे वाटप केल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. दिवाळीत मावळ तालुक्यातील विविध आदिवासी पाड्यावर अनेक सेवाभावी संस्था अशा प्रकारचे उपक्रम घेतले जात आहे, ज्या मुळे आदिवासी वाड्या पाड्यावर आनंदाचे क्षण येतात.

error: Content is protected !!