अनंत जन्मीचे विसरलो दु:ख | पाहता तुझे मुख पांडुरंगा ll
वडगाव मावळ:
कार्तिक स्नान काकड आरती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. ओम साई वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ व ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
कार्तिक स्नान काकड आरती सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे .
  २५वर्ष संपून  २६व्या वर्षात पदार्पण करत आहे.मुंबई सारख्या शहरात आपला काम धंदा सांभाळून गेले २६वर्ष ओमसाई वारकरी संप्रदायक भजन मंडळ व ओम साई गृहनिर्माण संस्था या कार्तिक स्नान काकड आरतीचे आयोजन करत असतात.याही वर्षी कार्तिक स्नान काकड आरती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
  सोमवार दिनांक १०/१०/२०२२ या दिवशी कार्तिक आरती प्रारंभ झाला आहे . जागर वार शनिवार दिनांक १२/११/२०२२ रोजी व काला रविवार दिनांक १३/११/२०२२पर्यत वरील मंडळाने आयोजित केला आहे तरघ वारकरी संप्रदायक मधील प्रवचनकार, किर्तनकार,गायनाचार्य, मृदुंगाचार्य व स्थानिक मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतात.
  २६ वर्षे ओमसाई वारकरी सांप्रदायिक भजन मंडळाला सोसायटीने या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आणि आजही मुंबई सारख्या ठिकाणी एवढ्या धावपळीच्या शहरात काकड आरती साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आपल्या सोसायटीचे संस्थांपक आदरनीय श्री. रवीभाऊ मुंढे व त्यांच्या पत्नी सौ.रेश्माताई मुंढे (ओम साई महीला मंडळ अध्यक्षा) व सोसायटीतील सर्व पदाधिकारी  सभासद सोसायटीच्या प्रत्येक  कार्यक्रमाला चांगले  सहकार्य करत असतात.
  ओम साई वारकरी सांप्रदायिक भजन मंडाळातील सर्व सभासद व ओमसाई आरती महिला मंडळ उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवतात ओम साई वारकरी सांप्रदायक भजन मंडाळातील सभासद येणाऱ्या प्रत्येक भावीकाचे चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतात ज्याला जसे शक्य होईल ते काम हाती घेऊन पुर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशिल आहेत.
महीन्याच्या कार्यक्रमात ज्याला जसे शक्य होईल तसे प्रयत्न करतात आणि आमच्या सारख्या मंडळींना या परमार्थिक सोन्याचा आंनद घेता येतो या मंडाळाला अतिशय छान सहकार्य  करणारे भजनी मंडळ उपस्थित राहतात.
इवलेसे रोप लावियेले द्वारी | त्याचा वेलू गेला गगनावरी
ओमसाई वारकरी सांप्रदायिक भजन मंडळातील सर्व सभासद एकोप्याने असल्या कारणाने आज आपल्याला या मंडळाचा वटवृक्ष पाहायला मिळतो. या मंडळाने खुप मेहनत घेऊन अनेक सांप्रदायिक कार्यक्रम हाती घेऊन यशस्वीपणे संपन्न केले आहेत.
ओमसाई वारकरी सांप्रदायक भजन मंडळ व ओम साई आरती महीला मंडळ,ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्था  सोसायटी कार्यक्रमाचे आयोजक असून न्यु लिंक रोड मेट्रो स्टेशन  डाहाणुकरवाडी कांदिवली प.मुंबई  येथे हा सोहळा सुरू आहे.

error: Content is protected !!