![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2022/11/Picsart_22-11-05_05-56-33-287-300x209.jpg)
आयुध निर्माणी देहुरोड मध्ये भव्यदिवाळी महोत्सवाचे आयोजन
देहूरोड:
आयुध निर्माणी देहुरोड येथे भव्यदिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.दि ५ आणि ६ नोहेंबर २०२२ रोजी आयुध निर्माणी देहुरोड वसाहती मधील पायरो स्पोर्ट मैदानावर संध्याकाळी६ ते रात्रीग१० वाजे पर्यंत भव्य दिवाळी मेळ्याव्याचे आयोजन आहे.
दिवाळी मेळाव्यामध्ये आर्मी परेड़, डॉग-शो, शिवकालीन युद्धकला, योगा, मलखांब खेळ, हेल्दी-बेबी स्पर्धा, जादू चे प्रयोग, फैन्सीचे ड्रेस, खेळ पैठणीचा, तंबोला इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर भव्य आतिषबाजीचे आयोजन सुद्धा केले गेलेले आहे.
या व्यतिरिक्त अनेक खाद्य पदार्थांचे स्टॉल, विविध घरगुती उपकरणांचे स्टॉल्स, गृहनिर्माण बिल्डर, मोठया डिस्काउंट मध्ये 2 चाकी 4 चाकी वाहनाचे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे. तरी सर्वांनी सहपरिवार, नातेवाइक व मित्रांबरोबर उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन नितीन जैन कार्य प्रबंधक कृते महाप्रबंधक यांनी केले आहे अशी माहिती कार्यसमिती सदस्य अशोक थोरात यांनी दिली आहे.
- शिक्षणाचा दर्जा न संभाळणा-या शिक्षकाला सेवेतून कमी करणार: दिपक केसरकर
- विद्रोह विवेकी असावा: प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस
- नूतनचे प्रा.दीपक पाटील यांना डॉक्टरेट
- शिवदुर्ग टीमचे प्रशासनाकडून कौतुक
- अतिवृष्टी असलेल्या भागातील शाळांना सुट्टी
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2022/11/Picsart_22-10-24_00-03-32-468-2-1024x728.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2022/11/Picsart_22-10-05_16-57-11-265-10-300x240.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2022/11/Picsart_22-09-02_21-12-10-302-2-1024x932.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2022/11/Picsart_22-04-08_23-15-23-934-4-819x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2022/11/PicsArt_01-17-12.45.53-5-212x300.jpg)