पवनानगर:
पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतचा अंतिम अहवाल पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा तसेच जमिन वाटपा संदर्भातील सर्व तांत्रिक त्रुटी अडचणी दुर करुन अंतिम अहवाल  सादर करण्याच्या सूचना आमदार सुनील शेळके यांनी मावळ महसूल प्रशासनाला दिल्या आहेत.
पवना धरणग्रस्त संयुक्त समितीच्या वतीने मावळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना पुनर्वसन बाबतची निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा तहसीलदार कार्यालयात झाली यानंतर धरणग्रस्तांच्या वतीने आमदार सुनील शेळके यांनी निवेदन दिले प्रशासनाला सदर अहवाल तातडीने सादर करावा तसेच धरणग्रस्त खातेदारांनी आपल्या हरकती संदर्भातील अर्ज कागदपत्रांची पूर्तता करुन देण्यात याव्या तसेच कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी दिल्या‌ यावेळी मुकुंद काऊर, रविकांत रसाळ, लक्ष्मण भालेराव, बाळासाहेब काळे, मारुती दळवी,दशरथ शिर्के , राम कालेकर, बाळासाहेब मोहोळ, नारायण बोडके, दत्तात्रय ठाकर, किसन घरदाळे, तुकाराम पाठारे, दत्तात्रय घरदाळे, शांताराम पाठारे,अनंता वर्वे, अनंता लायगुडे, रोहिदास कडु, सिताबाई डोंगरे, धरणग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
धरणग्रस्त संयुक्त समितीच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या
१.धरणगस्तांनी जमिन वापपासंदर्भातील नाव नोंदणी संदर्भातील ५६३ हरकती बाबत योग्य ती तपासणी करून निर्णय घ्यावा
२.यापूर्वी पुनर्वसन झालेल्या खातेदारांची अद्यावत गाववार यादी देण्यात यावी..
३.सन १९९५ ते ९८ दरम्यान जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये जमीनी पुनर्अनुदानित केलेल्या
खातेदारांची गावनिहाय यादी देण्यात यावी.
४. पवना धरणग्रस्थांच्या वारसांना पिंपरी चिंचवड महापालिका व औद्योगिक कारखाण्यामध्ये  नोकऱ्या देण्यात याव्यात प्राध्यान्य द्यावे
वरील मागण्यांचा विचार करून खातेदारांनी दिलेल्या हरकतीनुसार त्या खातेदारांच्या जमीनी संपादित झाल्या आहेत त्यांची नावे वाटप यादीत नसल्याने पुरावे तपासुन त्यांची नावे वाटप यादीत समाविष्ट करावी. व ज्यांना यापूर्वी जमीनी वाटप केलेल्या आहेत. अशा खातदेरांची यादीतील दुबार आलेली नावे कमीकरून पात्र लाभार्थी खातेदारांची नव्याने अद्यावत यादी तयार करून येत्या पंधरा दिवसात ९ मे १९७३ च्या प्रशासकिय आदेशानुसार पुनर्वसन प्रक्रिया त्वरीत सुरु करावी अन्यथा आम्ही धरणग्रस्त नाईलाजास्तव पवनेचे पाणी बंद अथवा जलसमाधी सारखे आंदोलन करु  त्यानंतर होणाऱ्या परीणामास शासन जाबादार राहिल असा इशारा निवेदनात दिला आहे
आमदार सुनील शेळके म्हणाले,”पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ८० टक्के कामपुर्ण झाले आहे मधल्या काळात सरकार बदलले परंतु याचा परिणाम कामावर होणार नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना भेटून यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यासाठी आग्रह धरलाय आहे  प्रशासनाने लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा अन्यथा धरणग्रस्तांच्यासोबत पवनेचे पाणी अडवणार

error: Content is protected !!