केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची आवारे यांना सदिच्छा भेट
तळेगाव स्टेशन:
महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारीणी पुणे यांच्यावतीने मानाचा असा समाजभूषण पुरस्कार किशोर यांना प्राप्त झाल्यामुळे सोमाटणे येथील नियोजित कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आवर्जून किशोर आवारे यांना भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.
हॉटेल एमराल्ड येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली यावेळी जनसेवा विकास समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार किशोर आवारे यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी विविध विषयांवरती चर्चा देखील करण्यात आल्या. किशोर यांचे समाजकार्य मोलाचे आहे समाजभूषण पुरस्कार हा त्या कार्याचाच बहुमान असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना सांगितले .
मावळ तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अनेक मान्यवर पदाधिकारी तसेच जनसेवा विकास समितीचे अनेक पदाधिकारी प्रसंगी उपस्थित होते. जनसेवा विकास समिती तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करत असून समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मागे खंबीरपणे उभा राहू असे आश्वासन यावेळी रामदास आठवले यांनी किशोर आवारे यांना दिले .

error: Content is protected !!