दिवाळी सणाला आमदार कळकराईत :गावक-यांनी केले जल्लोषात स्वागत
वडगाव मावळ:
मावळ  तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील कळकराई गावातील ग्रामस्थांची आमदार सुनिल शेळके यांनी दिवाळी गोड केली,दिवाळी सणाला आमदार गावात आल्याने गावक-यांनी केले जल्लोषात स्वागत.
अतिदुर्गम असणारे कळकराई गाव मावळ तालुक्याचे शेवटचे टोक आहे.याठिकाणी  जाऊन आमदार शेळके यांनी दिवाळी फराळ, मिठाई, महिलांसाठी साड्या, लहान मुलांसाठी फटाके, कपडे वाटप करून ग्रामस्थांची दिवाळी गोड केली आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कळकराई गावात जाणारे आमदार  सुनिल शेळके हे पहिले आमदार ठरेल.याचा गावकऱ्यांना मोठा आनंद झाला.
आमदार शेळके  यांच्या स्वागतासाठी गावातील नागरिकांनी घरासमोर गुढी उभारली होती.आमदार शेळकेंसह पदाधिकाऱ्यांचे गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.या भेटीदरम्यान येथील अनेक वर्षांपासून रस्ते,पाणी, वीज अशा मुलभुत सुविधांपासून वंचित असून याबाबत आमदारांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.
यापुढील काळात मुलांचे शिक्षण, आरोग्याच्या सुविधांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहील व विकासकामांना देखील प्राधान्य देऊन सोडविण्यास मी कटिबद्ध राहणार असल्याचे आमदार शेळके यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले.
माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, चंद्रकांत दाभाडे, संदीप आंद्रे, बाबाजी गायकवाड, देवा गायकवाड, दत्तात्रय पडवळ, सरपंच नामदेव गोंटे, नागु ढोंगे, सदस्य भरत साबळे, चंद्रकांत कावळे, लक्ष्मण कावळे, रवी काठे, पोलीस पाटील चहादु गोंटे, संतोष कोंढरे,भाऊसाहेब मोरमारे, तानाजी पडवळ, शोभीनाथ भोईर,  नारायण मालपोटे, अतुल मराठे, संदीप सदावर्ते उपस्थित होते.
घरापुढे उभारल्या गुढ्या
मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात कळकराई गाव वसलेले असून याठिकाणी पन्नास कुटुंब असून सुमारे तीनशे लोकसंख्या असलेले गाव आहे.अद्यापपर्यंत स्वातंत्र्यानंतर कुठलेही आमदार याठिकाणी आले नव्हते.दिवाळी साजरी करण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी भेट दिल्याने नागरिक भारावून गेले होते.यावेळी गावातील सर्व नागरिकांनी घरासमोर गुढी उभारली होती.आमदारांची गावातुन जल्लोषात मिरवणूक काढून गावातील सर्व माता-भगिनींनी औक्षण करून स्वागत केले.

error: Content is protected !!