बजरंग दलाच्या वतीने तिकोना गडावर दीपोत्सव
पवनानगर :
बजरंग दल मावळ तालुक्याच्या वतीने किल्ले तिकोना गडावर दीपावली निमित्त दीपोत्सव करण्यात आला. प्रथम वितंडेश्वर महादेव मंदिरात अभिषेक  व  आरती करण्यात आली. नंतर गडावरील महादेव मंदिर, महाद्वार बालेकिल्ला, चपेटदान मारुती या सर्व ठिकाणी दीपावलीनिमित्त दिवे लावून आरास करण्यात आली.
  संपूर्ण भारतभर दीपावली हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे गड किल्ले या दीपोत्सवापासून वंचित राहिला नको याच संकल्पनेतून बजरंग दलाच्या वतीने प्रतिवर्षी विविध दुर्गांवर दीपोत्सव करण्यात येतो.
   तालुक्यातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना राजमाची, कोराईगड तसेच कार्ला येथील श्री एकविरा माता मंदिर,  महागाव येथील महादेव मंदिर, नाणे मावळातील कोंडेश्वर महादेव मंदिर, श्री शेत्र घोरवडेश्वर महादेव मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, श्री वडेश्वर महादेव मंदिर, नऊ लाख उंबरे येथील श्रीराम मंदिर अशा विविध ठिकाणी  दीपोत्सव करण्यात आला आहे
शिवभक्तांनी प्रतिवर्षी दीपावलीनिमित्त आपल्या या शिवाजी महाराजांच्या गडावर येऊन दीपोत्सव करावा असे
आव्हान बजरंग कांबळे यांनी केले.
यावेळी  सचिन शेलार संदेश भेगडे गणेश जुनवणे भास्कर गोलिया दीपक अग्रवाल विश्वास दळवी आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!