किशोर आवारे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान
पुणे:
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारीणी सभा पुणे, आयोजित,
पुण्यातील साहित्य वर्तुळातील मानाचा मानला जाणारा ” “समाजभूषण पुरस्कार” जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष  किशोर  आवारे यांना माजी कुलगुरू, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. रामनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  भारत सासणे ,महाराष्ट्र साहित्य कला प्रसारीणी चे अध्यक्ष उद्धव कानडे, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, त्रिदल चे डॉ. सतीश देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.
किशोर आवारे यांनी केलेल्या कार्याची दखल  साहित्याने घेतली असून जनसेवा थाळीच्या माध्यमातून आवारे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले.
कोल्हापूर व चिपळूण पुरात केलेली निस्वार्थी मदत, या सर्व कार्याचा गौरव व्हावा यासाठीच किशोर आवारे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे डॉ. रामनाथ कोत्तापल्ले यांनी नमूद केले.
अनेक साहित्यिकांनी व कवींनी सदर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.आपण कुठलाही पुरस्कार स्वीकारत नाही व कुठल्या कार्याची जाहिरातही करत नाही, समाजासाठी सढळ हाताने मदत करण्यातच मला आनंद आहे. मी समाजाचं देणं लागतो आहे. समाजभूषण पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे ,मी भविष्यातही निस्वार्थी काम करीन असे किशोर आवारे यांनी पुरस्कार स्वीकारताना नमूद केले.

error: Content is protected !!