टाकवे बुद्रुक:
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबाजी गायकवाड यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त शिवलीला पाटील यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन केले होते. तसेच भाऊबीजेचे औचित्य साधून आंदर मावळ व नाणे मावळातील पाचशे आदिवासी महिलांना साडी वाटप केले.
विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. आमदार सुनिल शेळके,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,उद्योजक शंकरराव शेळके,मावळ तालुका दिंडी सोहळा समाजाचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके,पुणे जिल्हा पशुसंवर्धनचे माजी सभापती बाबूराव वायकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर,माजी उपसरपंच तुकाराम ढोरे,माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, तालुका काँग्रेसचे माजीअध्यक्ष बाळासाहेब ढोरे,मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर,मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा दिपाली गराडे,माजी अध्यक्षा सुवर्णा राऊत,सरपंच नामदेवराव शेलार, माजी सरपंच तुकाराम असवले, माजी सरपंच शांताराम लष्करी,सरपंच परिषदेच्या उपाध्यक्ष सविता भांगरे,माजी सरपंच भूषण असवले,सरपंच मोहन घोलप,सरचिटणीस मारूती असवले,खादीग्रामोद्योगचे अध्यक्ष अंकुश आंबेकर,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, किर्तनकार जयश्रीताई अक्षय येवले,अर्थउन्नती बॅकचे संचालक अक्षय येवले, ,उद्योजक देवा गायकवाड, माजी अध्यक्ष  कैलास गायकवाड ,राष्ट्रवादीचे प्रवक्ते राज खांडभोर ,आंदर मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष रूपेश घोजगे, पवन मावळ अध्यक्ष भरत भोते,उद्योजक विक्रम कलावडे, दिंडी समाजाचे माजी अध्यक्ष रोहीदास धनवे,पांडुरंग येवले, राजेंद्र सातकर,गणेश जांभळे, नवनाथ आंबेकर यांच्यासह टाळकरी, विणेकरी, मृदुंगाचार्य, गायक, वादक व वारकरी संप्रदायातील वैष्णव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किर्तनकार शिवलीला पाटील यांनी खास त्यांच्या शैलीत केलेल्या विवेचनात श्रोता वर्ग भक्ति रसात तुंबून गेले होते. सकाळी दहा ते बारा या वेळेत असलेल्या या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद लाभला. निगडे, भोयरे, कुणे, सावळा, डाहुली, कुसवली, घोणशेत,फळणे, गोवित्री सह अन्य गावे व वाड्या वस्त्यांवरील आदिवासी महिलांना माजी सरपंच जिजाबाई गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप झाले.
प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वार आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. कीर्तनाची सांगता झाल्यावर अन्नदान करण्यात आले.
आमदार सुनिल शेळके यांनी उपक्रमाचे कौतुक करत अभिनंदन केले. तुकोबाराय सद्बुद्धी देत सर्वाची स्वप्न साकार होतील असा आशीर्वाद मागितला .
माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड म्हणाले,” बंधू दत्ताशेठ गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर आहे. आपण सर्वजण अशाच भरभरून आशीर्वाद द्याल असा विश्वास आहे.

You missed

error: Content is protected !!