टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुवर्णा बाबाजी असवले यांची बिनविरोध निवड झाली. मावळते सरपंच भूषण असवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी मंडलाधिकारी सुरेश जगताप,यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली,सरपंच पदासाठी सुवर्णा बाबाजी असवले,अविनाश मारूती असवले,सोमनाथ शांताराम असवले,संध्या दतात्रय असवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
विहित वेळेत सुवर्णा असवले वगळून इतर तिघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुवर्णा असवले यांची बिनविरोध निवड झाली.असवले यांच्या निवडीनंतर भंडारा गुलालाची उधळण करीत फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात मावळते सरपंच भूषण असवले यांच्या सुवर्णा असवले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच परशुराम मालपोटे,अविनाश असवले, प्रिया मालपोटे,प्रतिक्षा जाधव,आशा मदगे, सोमनाथ असवले,जिजाबाई गायकवाड,सतू दगडे,ज्योती आंबेकर,संध्या असवले ,विश्वनाथ असवले सर्व सदस्य उपस्थित होते. गावकामगार तलाठी गणेश पोतदार व ग्रामविकास अधिकारी सुभाष बांगर यांनी सहाय्यक म्हणून काम केले.
ज्येष्ठ नेते संभाजी टेमगिरे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले,अनिल मालपोटे,मारूती असवले,राजू जाधव,किसन ननवरे, दत्तात्रय असवले,तानाजी असवले, बाळासाहेब जाधव,बाळासाहेब कोकाटे,शेखर मालपोटे,गोरख मालपोटे,गणेश गवारी,पांडुरंग मदगे,बाळू मालपोटे,शंकर मालपोटे,जालिंदर मालपोटे,मधु जांभुळकर,राजू असवले,पांडुरंग साने,राहुल साने,किरण बोडके,लालासाहेब पाचपुते,सोपान असवले,महेंद्र असवले,शांताराम सोंडेकर, धोंडिबा टेमगिरे,धनसिंग  परदेशी उपस्थित होते.
सुवर्णा असवले म्हणाल्या,” बिनविरोध सरपंच पदासाठी मदत केलेल्या सर्व गावकरी,सदस्य यांचे आभार मानते. माहेरी आणि सासरी राजकीय व सामाजिक कार्याचा वसा आहे,तो जपत सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील राहील.

You missed

error: Content is protected !!