तळेगाव स्टेशन:
  आमदार सुनिल  शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दीपावली निमित्त तळेगाव शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तळेगाव दाभाडे शहरातील  सोनावणे वस्ती व नाच्किन वस्ती मधील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
  तसेच मुलांच्या शैक्षणिक अडचणी समजून घेतल्या,  मुले शाळेत जातात का नाही ? काही अडचण आहे का ? किती मुले शाळेत जात नाही ह्याची नोंद घेतली व मुलांसोबत आणि पालकांसोबत राष्ट्रवादी युवती काँग्रेसने संवाद साधला श्रुतिका विश्वनाथ कांबळे.अध्यक्ष तळेगाव दाभाडे (स्टेशन विभाग) राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी शिवानी सोनावणे,हर्षला शिंदे,वैष्णवी शिंदे,आरती तरकसे,प्रीती तरकसे, रश्मी चौढरी उपस्थित होत्या.
श्रुतिका कांबळे म्हणाल्या,” दिवाळी हा आनंदाचा सण आहे,या सणात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद फुलला होता. विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

error: Content is protected !!