तळेगाव दाभाडे:
येथील युवा उद्योजक महेश निंबाळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्योग व व्यापार सेल च्या  तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते निंबाळकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
  यावेळी राष्ट्रवादीचे  जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते.  उद्योग व्यापार सेल चे जिल्हाध्यक्ष सुभाष गव्हाणे यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या शिफारशीनुसार निंबाळकर यांची तालुकाध्यक्ष पदी निवड केली.
   देशाचे नेते शरद पवार साहेब, राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचाराने व आमदार सुनीलशेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना वाढी साठी मी कायम प्रयत्न करत राहणार असल्याचे  महेश निंबाळकर यांनी सांगितले.

You missed

error: Content is protected !!