टाकवे बुद्रुक:
पुण्यश्री महिला बचत गट योजना अंतर्गत मावळ तालुक्यातील वडेश्वर येथे महिला बचत गट मार्फत महिलांनी बनवलेले उत्पदन करणे व विकणे या माॅलचे व माऊच्या मोरमारेवाडी तील अंगणवाडी इमारतचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालक चंद्रकांत  पाटील यांच्या हस्ते झाले.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकरी अधिकारी आयुष  प्रसाद यांनी ही योजना महिला बालकल्याण योजना पुणेचे जामसिंग गिरोसे व विशाल कोतागडे महिला बालकल्याण अधिकारी  मावळ यांच्या पुढाकारातून ही योजना राबविण्यात आली.
या  बाबत संतोषी माता बचत गट यांनी एकूण दोन लाख कर्ज जिल्हा परिषद योजनेतून आज देण्यात आले.या  योजनेसाठी  वडेश्वर येथील संतोषीमाता बचत गटाने विहित नमुन्यात प्रस्ताव दाखल करून पाठपूरावा केला.
असे आयुषजी प्रसाद यांनी केला. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे,गट विकास अधिकारी सुधीर भागवत या प्रशासनातील अधिका-यांसह माजी आमदार दिंगबर भेगडे,  भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,  तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे , माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, सरपंच छाया हेमाडे ,उपसरपंच वासुदेव लष्करी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ माजी सरपंच शांताराम लष्करी, माजी  सरपंच संतोषी खांडभोर उपस्थित होते.
सूत्रसंचालन  रविंद्र हेमाडे यांनी केले.राजेश खांडभोर यांनी प्रास्ताविक केले. सरपंच छाया हेमाडे यांनी आभार मानले.

You missed

error: Content is protected !!