चांदखेड:
चांदखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संत रामजीबाबा ग्रामविकास पॅनलने ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवून प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. संत रामजीबाबा ग्रामविकास पॅनलने एक हाती सत्ता आणली.
सरपंचपदाच्या निवडणुकीत मीना दतात्रय माळी यांना एकूण १४८६ मते मिळाली. तर अरूणा महेंद्र आगळे यांना ८४४ मते मिळाली. त्यामुळे चांदखेड ग्रामपंचायतीच्या या चुरशीच्या लढतीमध्ये सरपंचपदी थेट जनतेतून मिळालेल्या ६४२ मतांनी माळी निवडून आल्या. पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय माळी यांच्या पत्नी असलेल्या मीना माळी यांच्या गळ्यात प्रथम लोकनियुक्त सरपंच पदाची माळ पडली.
  ही निवडणूक भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी अशी न होता गावातील समविचारी पुढा-यांनी  एकत्र येऊन ही निवडणूक  लढवली
  संत रामजीबाबा ग्रामविकास पॅनलचे बहुमताने निवडून आलेले सदस्य अनुक्रमे
सरपंच – मीना दतात्रय माळी – १४८६
१. गावडे उर्मिला संदीप – ४७६
२. गायकवाड प्रमोद बबन – ४९३
३. गायकवाड प्रियांका ओंकार – ४४३
४. कांबळे पूजा तेजस – २५८
५. बावकर तेजस दत्तात्रय – २२०
६. केदारी दादाभाऊ सुदाम – ३८१
७. कांबळे सागर तानाजी – ३५८ ८. गायकवाड सागर दिली – २९३
९. गायकवाड वृषाली उमेश – ३५३
विरोधी पॅनलचे बहुमताने निवडून आलेले सदस्य १. कदम पूजा अमित – ३४५
२. गायकवाड रुपाली दिनेश – ३७९

error: Content is protected !!