गडकल्याण प्रतिष्ठान पुणे या दुर्गसंवर्धन संस्थेने केली अनाथ आणि निराधार मुलांसोबत दिवाळी साजरी
  वडगाव मावळ:
शुभ्रा आधार फाउंडेशन संचलित जीवन अंकुर आश्रम काटेवस्ती कासारसाई रोड दारुंब्रे ता.मावळ जि. पुणे
येथील निराधार मुलांना शालेय साहित्य,इडली मिक्सर, पॅकिंग मशीन,दिवाळी फराळ, फटाके,खेळणी भेट दिल्या.
यावेळी संस्थेचे  मुंडें आणि सौ.मुंडे यांनी सर्व सभासदांचे स्वागत करून मुलांची आणि संस्थेची माहिती दिली.
   अनाथ आणि निराधार मुलं सांभाळताना येणाऱ्या अनेक अडचणी,होणाऱ्या त्रासाबद्दल सांगताना मुलांबद्दल ची आस्था ही प्रकर्षाने जाणवत होती.
गडकल्याण प्रतिष्ठान करत असलेल्या कार्याबद्दल अध्यक्ष गणेशराव जाधव यांनी थोडीशी माहिती दिली. तर भेट वस्तूंच्या चालवण्याच्या बद्दल प्रतिष्ठान चे पालखी सोहळा प्रमुख संजय भाऊ पाटील यांनी माहिती दिली. बाकी सर्वच मान्यवर सदस्यांनी दिवाळी फराळ, फटाके, खेळणी चे वाटप केले.
   या विधायक आणि महत्वपूर्ण कार्यात आमची संस्था सदैव आपल्या पाठीशी आहे असंच सेवा भावी कार्य निरंतर चालू ठेवावं अशा सधीच्छा आणि शुभेच्छा प्रतिष्ठान चे संस्थापक सुभाषराव आलम यांनी दिल्या. तर सर्वांचे आभार खजिनदार सुनीलभाऊ जाधव यांनी मानले.
त्याचबरोबर या मदतकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे संघटक राजेंद्र चौधरी यांनी आभार मानले.

error: Content is protected !!