वडगाव मावळ:
मावळ  तालुक्याचे आमदार  सुनिल शेळके  व आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश घोजगे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून राजपुरी गावातील कुमारी आदिती बाळू तलावडे या पाचवी इयत्तेत व  रुद्र भाऊ शिंदे दुसरी इयत्तेत शिकणा-या दोन विद्यार्थ्याची शैक्षणिक जबाबदारी आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रूपेश घोजगे यांनी स्वीकारले.
या दोन्ही विद्यार्थ्याचा दहावीपर्यंत  शिक्षणाची जबाबदारी आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश घोजगे यांनी स्वीकारली.
वाढदिवसाला नवा संकल्प घेऊन पुढे जायचं असते, त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी जपायची ही शिकवण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने दिली याच शिकवणीला अनुसरून रूपेश घोजगे यांनी या विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असल्याचे गौरवोद्गार अनेक वक्त्यांनी काढले.
आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला जात आहे.याच पार्श्वभूमीवर आपला दिवसही इतरांना उपयोगी ठरवा या हेतूने या दोन विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व घेतले असल्याचे घोजगे म्हणाले.
येणाऱ्या काळातही शिक्षणापासून आंदर मावळ परिसरातील कोणीही वंचित राहणार नाही यासाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचे घोजगे म्हणाले.

error: Content is protected !!