वीस पट संख्या असलेल्या  शाळा बंद करु नका
मावळ तालुका महिला शिक्षक संघाची पालकमंत्र्यांकडे मागणी
वडगाव मावळ:
मावळ तालुका हा डोंगरी व दुर्गम असल्याने २० पटाच्या आतील शाळा बंद करु नये अशी मागणी मावळ तालुका महिला शिक्षक संघाने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या महिला बचत गटाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते वडेश्वर ता.मावळ येथे झाले.दुर्गम भागात वाहतुकीच्या साधनांचा अभाव असतो.तसेच पालकांचेही विविध कारणांमुळे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते.गावापासून दूर अंतरावर शाळा असल्यास बरेचसे विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भिती नाकारता येत नाही.
विशेषतः मुलींचे शिक्षण थांबण्याची शक्यता असते.त्यामुळे २० पटाच्या आतील शाळा बंद करु नये अशी आग्रही मागणी महिला शिक्षक संघाने केली.पालकमंत्र्यांनी २० पटाच्या आतील शाळा बंद होणार नाहीत अशी उत्फुर्त प्रतिक्रिया महिला शिक्षक संघास दिली.
यावेळी मावळ तालुका महिला शिक्षक संघाच्या अध्यक्षा संगिता शिरसाट,नेत्या मनिषा गाडे,कार्याध्यक्षा वनिता पोंक्षे,सरचिटणीस वैशाली जुन्नरकर,कोषाध्यक्षा शुभदा वैद्य उपस्थित होत्या.

error: Content is protected !!