कामशेत:
बडवे इंजिनिअरींग लिमिटेड खांलुब्रे ता.खेड जि.पुणे या युनिट च्या वतीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलसे-अहिरवडे या शाळेत व ग्रुप ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले.
आंबा,चिंच,आपटा,पळस, व इतर अशा  दोन  हजार  रोपांची लागवड करण्यात आली. चिखलसे -अहिरवडे या ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सचिन  काजळे.म यांच्या मागणीने या परिसरात रोपे देण्यात आली आहे.
कंपनीचे  एच,आर, मॅनेजर सुनिल कुमार  राॅय , आनंद बद्रिके, विकास बोंबले, प्रदिप मोहिते व्हा.चेअरमन कान्हे वि.का.सोसायटी यांनी विशेष प्रयत्न केले .जि.प.प्राथमिक शाळा सर्व शिक्षक वृंद व सरपंच, उपसरपंच ,सदस्य व ग्रामस्थ सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या वेळी उपस्थित होते.

You missed

error: Content is protected !!