विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी मुख्याध्यापक  संघ बांधील ..राजेश गायकवाड                                     
   वडगाव मावळ:
   पुणे जिल्हा शिक्षण विभाग माध्यमिक जि.प पुणे आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेला मावळ मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संघाचे वतीने विद्यार्थी व शाळा यांचे विकासासाठी अनेकानेक उपक्रम राबविले जातात पण आजचा उपक्रम हा गुणवत्तेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे तसेच विद्यार्थी गुणवत्तेसाठी मुख्याध्यापक संघ सदैव बांधील राहील असे मत व्यक्त केले.
   मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श विद्यामंदिर(माध्य.) तळेगाव दाभाडे येथे घेण्यात आली या वेळी संस्था पदाधिकारी संस्थेचे सचिव मा.श्री यादवेंद्र खळदे यानी कार्यशाळेतील उपस्थितीतांना शुभेच्छा दिल्या.या कार्यशाळेला पंचायत समीतीचे गट शिक्षणाधिकारी मा.बाळासाहेब राक्षे यांनी इ 5 वी  व इ 8 वी या शिष्यवृत्ती परीक्षे बरोबरच NMMS या शिष्यवृत्ती साठी जास्तीतजास्त विद्यार्थी परीक्षेस समाविष्ट व्हावेत व मेरीट मध्ये यावेत असे आवाहन केले .
   तसेच तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे , आदर्श विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेस तज्ञ मार्गदर्शक म्हणून संकेत पोंक्षे ,उमेश इंगूळकर,सविता केंगले व श्रीकांत दळवी यांनी काम पाहीले.
   कार्यक्रमाची प्रसन्न सुरूवात आदर्श विद्या मंदीराच्या माध्यमिक विभागातील महिला शिक्षिकांनी ईशःस्तवन आणि स्वागतगीताने झाली .कार्यक्रमासाठी बी एम भसे ,दौलतराव शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रशिक्षणार्थी मधून नामदेव गाभणे,प्रतीक्षा ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  किसन पाटील यांनी केले नियोजित कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यशाळा संपन्न झाली.

error: Content is protected !!