शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शाळा वाचवा
अभियानास पुणे जिल्ह्यासह मावळ तालुक्यात उत्स्फूर्त सहभाग
वडगाव मावळ:
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे शाळा वाचवा या अभियानांतर्गत या शाळा बंद करू नये म्हणून शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्याकडून जिल्हाधिकारी व शिक्षक आमदार कपिल पाटील मावळचे आमदार सुनील शेळके यांचे मार्फत शासनास ठराव करून देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत भेट देऊन शिक्षक भारती संघटनेच्या वतीने ठराव घेण्यात येत आहे.
याला मावळ तालुक्यातून खूप मोठी साथ मिळत असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष अंकुश येवले व जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय ठाकर यांनी सांगितले.तालुकाध्यक्ष गोरख जांभुळकर महिलाध्यक्षा कविता शिवणेकर व संपूर्ण शिक्षक भारतीचे शिलेदार या अभियानात सक्रीय सहभाग घेत आहेत .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवलेवाडी येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना  मनिषा आडकर, माया घारे, शारदा सुतार, सुनिता आडकर, वैशाली येवले व कविता सोनवणे आदि पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व कसल्याही परिस्थितीत आम्ही कमी पटाच्या शाळा बंद होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले
शाळा बंद झाल्या तर अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील व मुली शिक्षण घेणार नाही. गोरगरिबांच्या मुलांचे मुलींचे शिक्षण बंद होईल त्यामुळे शासनाने कमी पटाच्या शाळा बंद करू नये. असे सांगून
शासनाच्या धोरणास तीव्र विरोध केला.
यावेळी उपसरपंच चंद्रकांत येवले शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास लामगण अंगणवाडी सेविका कविता कुंभार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!