वडगाव मावळ:
मावळ तालुका पुढील एक वर्षात टी.बी. मुक्त करु असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री टी.बी.मुक्त अभियानाअंतर्गत टी.बी.मुक्त मावळ साठी आमदार शेळके यांच्या वतीने मोफत पोषण आहार वाटप करण्यात आले यावेळी शेळके बोलत होते.
प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानाअंतर्गत मावळ तालुका टीबीमुक्त करण्यासाठी गरजू गरीब क्षयरोग रुग्णांना मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनकडून मोफत पोषण आहार वाटप आमदार  शेळके यांचे शुभहस्ते करण्यात आले.
     “साऱ्या जगाचा नारा, क्षयरोग संपवू सारा” असा नारा देत मावळ तालुक्यात ‘तालुका क्षयरोग पथक मावळ ‘ व निक्षय मित्र ‘मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन’ सक्रिय असून पौष्टिक आहारामुळे क्षयरोगावर लवकर मात करता येते म्हणून
मावळ तालुका लवकरात लवकर टी.बी.मुक्त व्हावा या उद्देशाने तालुक्यातील सर्व क्षयरोग रुग्णांना मोफत पोषण आहार वाटप करणार असल्याचे आमदार शेळके यांनी जाहीर केले .
त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनला सूचना दिल्या.मावळ तालुक्यात पाचशे च्या आसपास क्षयरुग्ण असून प्रतिनिधिक स्वरूपात काही गरीब गरजू क्षयरोग रुग्णास आज मोफत पोषण आहार वाटप करण्यात आले.
    यावेळी क्षयरोग रुग्णांनी स्वअनुभव कथन करत असताना सांगितले की,”  क्षयरोग विभागामार्फत आमची खूप काळजी घेतली जाते सातत्याने आमचा औषधउपचार निर्धारित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी संपर्कात राहून पाठपुरावा केला जातो. क्षयरोग रुग्णांनी निक्षय मित्र आमदार  सुनील शेळके यांचे
आभार व्यक्त केले.
          सदर पोषण आहार वाटप कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक अधिकारी प्रतिमा वंजारी  यांनी उत्तम नियोजन करून कार्यक्रम उत्साहात संपन्न केला. उद्योजक  सुधाकर शेळके, ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयश्री ढवळे, ग्रामीण रुग्णालय काळे कॉलनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.खैरमोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ इंद्रनील पाटील याप्रसंगी उपस्थित होते.
   मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आयुष प्रसाद,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील पोटे,डॉ. संजय दराडे यांचे  अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.गुणेश बागडे , वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक मारोती सूर्यकार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असिफ शेख, चाय संस्थेचे समन्वयक शशिकांत भिसे यांनी सहकार्य केले.
ज्या व्यक्तींना दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला ,ताप येतो, वजन कमी होत आहे अशी लक्षणे दिसतात त्यांनी जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन थुंकी तपासणी व एक्स-रे करून घ्यावा. क्षयरोगा रोगाच्या आवश्यक सर्व तपासणी व उपचार सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे .रुग्णांना औषधोपचार चालू असेपर्यंत शासनामार्फत दरमहा पाचशे रुपये देखील मिळतात अशी माहिती वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक  प्रतिमा वंजारी यांनी  दिली.

You missed

error: Content is protected !!