तळेगाव दाभाडे:
तळेगाव जनरल हॉस्पिटल अ‍ॅण्ड कॉन्व्हलसन्ट होम  नियामक मंडळाच्या अध्यक्ष पदी गणेश वसंतराव खांडगे यांची निवड करण्यात आली. ९७ वर्षाचा इतिहास असलेल्या या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत खांडगे यांच्या सह अन्य कार्यकारणी निवडण्यात आली.
तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि  कॉन्व्हलसन्ट होम  नियामक मंडळाचे मावळते अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळाची सर्वसाधारण सभा पार पडली,या बैठकीत पंचवार्षिक मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
माजी आमदार कृष्णराव भेगडे ३१ वर्षे या नियामक मंडळाचे अध्यक्ष होते,त्यांच्या जागी खांडगे यांची वर्णी लागली.या सर्वसाधारण बैठकीला ज्येष्ठ नेते वसंतराव खांडगे, दिलीप  शाह, डॉ .मिलींद  निकम ,डॉ.अरुण सोनावणे , देवेंद्र बारमूख,श्रीमती.आशा सरदेसाई , राजीव सरदेसाई , नितीन सरदेसाई यांच्यासह संस्थेचे  लेखापाल महेश  मलहोत्रा,कायदेशीर सल्लागार व अँड. सचिन नवले उपस्थित होते.
यावेळी जाहीर करण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे:
अध्यक्ष -गणेश  खांडगे,उपाध्यक्ष दिपक शहा ,सभापती शैलेश   शहा,उपसभापती चंद्रभान खळदे,मानद सचिव डॉ. सत्यजित वाढोकर ,मानद  खजिनदार विनायक अभ्यंकर,सभासद  रामदास काकडे, डॉ .शाळीग्राम भंडारी, कॅप्टन हेमंत सरदेसाई, डॉ.शशिकांत  पवार ,डॉ .किरण  देशमुख , संजय साने व सुखेंन्दू कुलकर्णी.
माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी संस्थेच्या कामाचा आढावा मांडला. प्रतिकूल परिस्थितीत संस्थेच्या वाढीसाठी डाॅ. भाऊसाहेब सरदेसाई यांनी केलेली पदरमोड नाकारता येणार नाही असेही भेगडे म्हणाले.
नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” पुणे मुंबई शहराच्या मध्यावर असलेल्या तळेगाव शहरात सर्व सुविधा युक्त कॅन्सर हॉस्पिटल होत आहे. यापुढे नेत्र रूग्णालय उभारणीवर संस्थेचा भर असेल.

error: Content is protected !!