वडगाव मावळ:
  मावळ तालुक्यातील सहकारी संस्थेचे  सहाय्यक निबंधक विठ्ठल  सुर्यवंशी यांचे निलंबन झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी
पल्लवी कोळेकर यांनी सूर्यवंशी यांच्या  निलंबन झाल्याचा आदेश जारी केला आहे.
सहायक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी  यांनी एकविरा गृहनिर्माण सोसायटी तळेगाव दाभाडे, पवना कृषक संस्था, काले कॉलनी व मावळ तालुक्यातील विविध विकास सोसायटी बाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतदीनुसार कार्यवाही केलेली नाही. तसेच सदर संस्थांवर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अनियमित व जाणीवपूर्वक कामकाज केल्याचे निदर्शनास येत आहे, असा ठपका ठेवून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
कक्ष अधिकारी पल्लवी कोळेकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,”
ज्या अर्थी, श्री. सुर्यवंशी यांनी सहकार आयुक्त कार्यालयाचे दि.०७/०१/२००५ रोजीचे परिपत्रकानुसार दिलेल्या सुचना विचारात न घेता अवसायकाचा त्रैमासिक अहवाल न घेता अवसायकाला जास्तीचे मानधन मंजूर केले आहे.
ज्या अर्थी, डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरू महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांना श्री. सुर्यवंशी यांनी दि. १०.०८.२०२२ रोजी अशासकीय भाषेत पत्र लिहून गैरवर्तन केले आहे. तसेच श्री. सुर्यवंशी यांचा विद्यापीठाच्या अंतर्गत बाबींशी काहीही संबंध नसतांना कुलगुरूंच्या कामकाजात व त्यांचे अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केलेला असुन ही बाब अंत्यत गंभीर स्वरूपाची आहे. तसेच श्री. सुर्यवंशी यांनी सदरचे पत्र सोशल मिडीयावर टाकुन कुलगुरूंची पर्यायाने विद्यापीठाची हेतुस्परपणे बदनामी केलेली आहे.
उपरोक्त कृती ही महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चा भंग करणारी असल्यामुळे श्री. विठ्ठल नामदेव सुर्यवंशी, सहायक निबंधक सहकारी संस्था ता.मावळ जि. पुणे हे शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र ठरतात.
त्याअर्थी, आता महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या भाग २ नियम ४ चे खंड (१) (अ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करुन श्री. विठ्ठल नामदेव सुर्यवंशी, सहायक निबंधक सहकारी संस्था ता. मावळ जि.पुणे यांना आदेशाच्या दिनांकापासून
करण्यात येत आहे.
शासन आणखी असाही आदेश देत आहे की, हा आदेश अंमलात असेल या कालावधीत श्री विठ्ठल नामदेव सुर्यवंशी, सहायक निबंधक सहकारी संस्था ता. मावळ जि.पुणे यांचे मुख्यालय विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे हे राहील व शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
निलंबन कालावधीत श्री. विठ्ठल  सुर्यवंशी, सहायक निबंधक सहकारी संस्था ता. मावळ जि.पुणे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी इ. काळातील प्रदाने) नियम १९८१ च्या नियम ६८ अन्वये प्रथमतः निलंबित केलेल्या दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीसाठी ५० टक्के निर्वाह भत्ता देय राहील. तद्नंतर तीन महिन्यापेक्षा निलंबनाचा कालावधी जास्त झाल्यास निर्वाह भत्त्याच्या रकमेत ५० टक्के इतकी वाढ करण्यात यावी. महागाई भत्त्याखेरीज नियमानुसार अनुज्ञेय असणारे इतर भत्तेही त्यांना अनुज्ञेय रहातील. सदर निर्वाह भत्ता देण्याबाबतची कार्यवाही करण्यास विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
श्री. विठ्ठल नामदेव सुर्यवंशी, सहायक निबंधक सहकारी संस्था ता. मावळ जि.पुणे यांना वैयक्तीक उद्योगधंदे व अन्य नोकरी करता येणार नाही, असे केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील तरतूदींचा भंग समजण्यात येईल व ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील व त्यांना निलंबन भत्ताही नाकारला जाईल, असा आदेश जारी करण्यात आला आहे

error: Content is protected !!