आमदार  सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबिराचे आयोजन
वडगाव मावळ:
मावळ विधानसभेचे  आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळातील नागरिकांसाठी मावळ डेव्हलमेंट फाउंडेशन व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या वतीने तीन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे महाआरोग्य शिबिर तळेगाव दाभाडे शहरातील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळा येथे शुक्रवारी (दि. १४), शनिवारी (दि. १५) व रविवारी (दि. १६) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.
या शिबिरांतर्गत हृदय, अन्ननलिका, मोतीबिंदू, हाडांचे फ्रेंक्चर, कान-नाक-घसा, श्वसन नलिका, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठी, मणका, किडनी, गर्भपिशवी, मुतखडा, सांधे, अपेंडिक्स, मुळव्याध, मॅमोग्राफी, दंतचिकित्सा, हार्निया, पित्ताशय पित्ताशयात खडे, मूत्राशयाच्या, कॅन्सर, गर्भाशयातील गाठी, डोळ्यांच्या व मेंदूच्या इत्यादी २६ प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. तसेच शिबिरात एमआरआय तपासणी, सीटी स्कॅन तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी श्रवणयंत्र, चष्मे, औषधे व नेत्र तपासणी मोफत असणार आहेत.
शिबीरात सहभागी  होण्यासाठी आधार कार्ड,रेशनिंग कार्ड, मेडिकल रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. या शिबिरादरम्यान तपासणी करण्यात येणाऱ्या रुग्णांवर मावळासह पुणे जिल्ह्यातील नामांकित रुग्णालयांत पुढील उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

error: Content is protected !!