तळेगाव स्टेशन:
आमदार सुनिल  शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त पुढारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. (माळवाडी) व समस्त ग्रामस्त माळवाडी यांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळयाचे आयोजीत करण्यात आले आहे. बुधवार दि. १९ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. माऊली मंगल कार्यालय माळवाडी येथे हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती पुढारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंथेची अध्यक्ष अर्जुन आल्हाट व संस्थेचे सचिव व माजी उपसरपंच चंद्रकांत दाभाडे यांनी
पुढारी पतसंस्थेच्या वतीने आमदार सुनिल शेळके,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहे.
माजीमंत्री मदन बाफना,माजी आमदार विलास लांडे,सहकारमहर्षी माऊली दाभाडे,जिल्हा बॅकचे माजी संचालक बबनराव भेगडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,साहेबराव काशिद (पा.)अध्यक्ष भंडारा डोंगर द.समिती,अध्यक्षा कुलस्वामिनी महिला मंचाच्या अध्यक्ष सारिका सुनिल शेळके,पशुसंवर्धनचे माजी  सभापती बाबूराव वायकर,विठ्ठलरावजी शिंदे मा. सभापती, माजी उपनगराध्यक्ष किशोर.भेगडे,तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे,दिपक हुलावळे कार्याध्यक्ष रा. कॉ. मावळ, साहेबराव कारके कार्याध्यक्ष मा. ता. राष्ट्रवादी काँग्रेस, महिला अध्यक्षा दिपाली गराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम,पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या सदस्या दिपाली हुलावळे,ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष संदीप आंद्रे आदि उपस्थित मान्यवर राहणार आहे.

error: Content is protected !!