टाकवे बुद्रुक:
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने टाकवे बुद्रुक येथे समाज प्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर ) यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. १५/१०/२०२२ रोजी सायं ४.०० वाजत मु.पो.टाकवे बु ।। ता.मावळ जि. पुणे येथे हा किर्तन सोहळा संपन्न होणार  आहे.
तरी सर्व नागरिकांनी व बंधू-भगिनींनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन जनसेवक. पै. देवाभाऊ अनंता गायकवाड यांनी केले आहे.
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी बांधव व नागरिकांना समाजप्रबोधनकार देशमुख यांचे किर्तन ऐकण्याची संधी मिळणार आहे.
देवाभाऊ गायकवाड परिसरातील लोकप्रिय युवा नेते असून आंदर मावळ व नाणे मावळातील महिला,पुरूष आणि वारकरी बांधवाना देवदर्शन घडवून आणण्यात त्यांचा पुढाकार आहे.

You missed

error: Content is protected !!