पवनानगर:
अखंड भारत मराठा साम्राज्य संघटनेच्या पुणे जिल्हा संघटक प्रमुख पदी  संतोष काळूराम दळवी यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र शेडगे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले .
पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांना संघटीत करून मराठा आरक्षणासाठी लढा उभारून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने पुणे जिल्ह्याची जबाबदारी  संतोष काळूराम दळवी यांच्यावर सोपवली आहे.
संतोष दळवी म्हणाले,” पुढील काळात मराठा समाजाला आणखी संघटित करून मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देण्यासाठी तीव्र स्वरूपाचा लढा देण्यात येईल
पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांचा मराठा आंदोलनाच्या समन्वयकांना लाच दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.  सरकारने नेमलेल्या मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील  आहेत.
सरकारमध्ये ते मंत्री आहेत तरी त्यांनी मराठा समाजाचे आंदोलन पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. तरी आपल्या सर्व पदांचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी  संतोष दळवी यांनी केली.

error: Content is protected !!