संस्कारची दिवाळी गडचिरोली येथील आदिवासींसोबत
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने  गडचिरोली येथील जिमलगट्टा अहेरी भामरागड या परिसरातील आदिवासी बांधवांना सोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे.
दिवाळी निमित्त कपडे  साड्या साखर रवा मैदा तेल साबण आकाश कंदिल उटणे इ साहित्याचे वाटप केले जाते, यावर्षी चिंचवड येथुन शनिवार दि.१५/१०/२०२२ रोजी सायंकाळी ५ वा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी बसची पुजा करुन बसला हिरवा झेंडा दाखवून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
आदिवासी बांधवाची  दिवाळी  गोड व्हावी यासाठी  साहित्य घेऊन एक वाहन निघाले आहे सोमवार दि.१७/१०/२२ रोजी आनंदवन सोबत दिवाळी साजरी करणार,मंगळवार दि.१८/१०/२२ रोजी हेमलकसा सोबत दिवाळी साजरी करणार, बुधवार दि.१९/१०/२२ रोजी दिवसभर जिमलगट्टा येथील आदिवासींसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
  ३००० आदिवासी बांधवांना साहित्य वाटप केले जाणार  आहे. १५००  साड्या,१००० पुरुष ड्रेस,५०० लहान मुलांची कपडे तसेच साखर ,रवा ,मैदा ,बिस्किट,लाडु,चिवडा ,तेल, उटणे ,साबण, बेसन पीठ, तुरडाळ, गुळ ,आकाश कंदिल अशा  वस्तुंचे वाटप करणार आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सागर कवडे आणि  जिमलगट्टा विभागीय पोलीस अधिकारी श्री सुजितकुमार  क्षिरसागर यांनी सहकार्य केले.यांचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ .मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले या उपक्रमाची तयारी एक महिना अगोदर चालु केली होती फक्त फेसबुक आणि व्हटसअपच्या माध्यमातून जमा झाले.

error: Content is protected !!