तळेगाव दाभाडे:
हॅण्ड इन हॅण्ड इंडिया व सहासंखा (CSR) यांच्या मार्फत सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम साई गाव मावळ तालुका, पुणे येथे आयोजित करण्यात आला.
सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रम उद्देश हा ग्रामीण भागातील अनेक लोक केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबिवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत पुरेशी जाणीव जागृती नसल्यामुळे त्या पात्र लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमा मार्फत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास निश्चितपणे मदत होईल.
साई गावातील सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, ई – श्रम कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, पेन्शन योजना (वृद्ध, विधवा, विकलांग), प्रधानमंत्री उज्वला योजना, सुकन्या समृध्दी योजना, पशुधन विमा, स्कॉलरशिप, मातृवंदना योजना, शिक्षणाचा अधिकार (RTE) व सार्वजनिक वितरण प्रणाली ( राशन स्वस्थ धान्य) इत्यादी विवीध योजनाची माहिती लोकांना देण्यात आली.
सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये साई गावातील  52 लोकांनी उपस्थिती नोंदवली त्यासोबत गावचे सरपंच जयश्री वाडेकर , उपसरपंच मंदाबाई गाडे तसेच अर्चना पिंगळे व शंकर पिंगळे  व मुख्याध्यापक बोरकूले गुरुजी  व ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती  कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून सतीश थारकुडे, सोनम राणे, अक्षदा लालगुडे व अर्चना पिंगळे  इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेकडून सतीश थारकुडे यांनी गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचे आभार मानले.

error: Content is protected !!