ट्रायबल फोरमच्या मावळ तालुका अध्यक्ष पदी मधुकर कोकाटे
टाकवे बुद्रुक:
ट्रायबल फोरमच्या मावळ तालुका अध्यक्ष पदी मधुकर कोकाटे यांची निवड करण्यात आली.आंदर मावळाचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत वरसुबाई मंदिरात ट्रायबल फोरमची बैठक झाली.
  ही सर्वसाधारण सभा संघटनेचे मावळते अध्यक्ष  कांताराम असवले यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संघटना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पाडली.
संघटनेची पुढील वाटचालीसाठी व सामाजिक चळवळीला अधिक वेगाने सुरू ठेवण्याची उद्दिष्ट समोर ठेवून  मधुकर कोकाटेयांची ट्रायबल फोरम मावळ तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
भिमाजी लोटे यांची संघटनेचे सचिव म्हणून निवड करण्यात आली. व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने अध्यक्ष व सचिव यांचा सन्मान करण्यात आला.
व सर्व कार्यकारिणीत बदल करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. ट्रायबल फोरम पुणे जिल्हा विभागीय उपाध्यक्ष मारुती खामकर गुरुजी ,ट्रायबल फोरम पुणे जिल्हा युवा अध्यक्ष  विक्रम हेमाडे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पाडली.
कांताराम असवले मा. अध्यक्ष  अनंता पावशे सरपंच खांडी, दशरथ आढारी,रविंद्र काठे युवा अध्यक्ष ,किसनराव गवारी,अनिल गवारी ,बाळासाहेब पावशे, बजरंग लोहकरे, अशोक सुपे उपस्थित होते.
समाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील व संघटनात्मक चळवळ  मजबूत करण्यासाठी प्रयत्न करु व सामाजिक कार्यातून आदिवासी समाजाला न्याय मिळवून देऊ
असे  नवनिर्वाचित अध्यक्ष  मधुकर कोकाटे म्हणाले.
सचिव लोटे यांनी  अनुभवी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!