राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी अमोल केदारी
वडगाव मावळ:
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिव पदी वाकसई येथील युवक कार्यकर्ते अमोल केदारी यांची निवड करण्यात आली, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली.
मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष पदी काम करणारा युवक अशी ओळख असलेल्या अमोल केदारी हा तरूण युवक वर्गात लोकप्रिय आहे.
अनेक वर्ष राष्ट्रवादीचे काम करत असुन वाकसई-कुसगाव जिल्हा परिषदेचे उत्तम नियोजन करून संपुर्ण पॅनल निवडुन आणत आपल्या कामाचे व जबाबदरीचे कर्तव्य बजवत पार्टीसाठी पुर्ण वेळ काम करत असल्याचे त्याच्या कामातून सिद्ध झाले आहे.
आमदार सुनिल शेळके व तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी युवक प्रदेश अध्यक्ष मेहबुबभाई शेख यांना शिफारस केली होती. या शिफारशींची दखल घेत मेहबुब शेख यांनी  केदारी यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली.

error: Content is protected !!