कामशेत:
राज्यांच्या सत्तांतरानंतर मावळ तालुक्यात भाजपचा पहिला सरपंच होण्याचा मान चिखलसे ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन मधुकर काजळे  यांना मिळाला आहे.माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली हा विजय खेचून आणण्यात भाजपा यशस्वी झाल्याचा दावा मावळ तालुका भाजपाने केला आहे.  चिखलसे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीत भाजपने बाजी मारल्याने भाजपाने आनंदोत्सव केला.
चिखलसे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते, राष्ट्रवादीला छोबीपछाड देत  सचिन मधुकर काजळे यांच्या रूपाने चिखलसे ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला.याचा भंडारा गुलालाची उधळण करीत,कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.
राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मावळ तालुक्यात राजकीय सत्तांतर होण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी चिखलसे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागून असताना मावळ भाजपचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी राजकीय डावपेच जिंकले आहेत. तसेच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य संपर्कात असून येणाऱ्या काळात अनेक ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येईल, असा विश्वास रविंद्र भेगडे यांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित सरपंच काजळे यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी  नगरसेवक अमोल शेटे, बंटी भेगडे, संदीप भेगडे, राहुल घाग, सचिन भेगडे यांच्यासह चिखलसे व अहिरवडे येथील युवा कार्यकर्ते तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!