श्री भैरवनाथ महाराज नवरात्र उत्सव निमित्त भजन स्पर्धेत भैरवनाथ व ताजुबाई भजनी मंडळ प्रथम
कामशेत:
कामशेत येथे ग्रामदैवत श्री.भैरवनाथ नवरात्र उत्सवाच्या निमित्त दि .६/१०/२०२२ ते दि.१०/१०/२०२२ पर्यत झालेल्या भव्य भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक (रु.११००० व पखवाज)
भैरवनाथ भजनी मंडळ ,कुसगाव बुद्रुक” व ताजुबाई भजनी मंडळ ताजे यांनी पटकावला.
  द्वितीय क्रमांक (रू.७०००/ ,व तबला )राधाकृष्ण भजनी मंडळ, नायगाव व विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ,ताजे यांना मिळाला.
   तृतीय क्रमांक…
(रु.५०००/ विणा  )नागनाथ भजनी मंडळ,औढे व वाघजई भजनी मंडळ,देवले यांना  चतुर्थ क्रमांक (रु.३०००/,टाळ)चे बक्षीस गोधनेश्वर भजनी मंडळ ,राजमाची व माऊली भजनी मंडळ,वाकसई यांनी मिळवला. सर्व विजेत्या भजनी मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.
या भजनी मंडळांनी बाजी मारली विजयी संघांना श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद कदम  यांनी केले व आभार अभिमन्यु शिंदे यांनी केले.
या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक पंडित किरण परळीकर यांनी  भैरवी गायनाने कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाप्रसंगी  जेष्ठ नेते माऊली शिंदे,माजी सभापती राजाराम शिंदे,जेष्ठ नेते शंकरनाना शिंदे,प्र.शेतकरी शंकर वि.शिंदे, मा.उपसरपंच ,सदस्य गणपत शिंदे,मा.ग्रा.सदस्य गजानन शिंदे,वैभव शिंदे,राम माने,मुकुंद शिंदे, तुषार शिंदे,दिनेश(आप्पा) शिंदे,अनिकेत शिंदे,रोशन शिंदे,महेश शिंदे, प्रसाद गाढवे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!