वडगाव मावळ :
येथील माळीनगर मध्ये नगरसेवक किरण म्हाळसकर यांच्या पुढाकाराने व माळीनगर मित्र मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या खेळ खेळूया गमतीच्या या कार्यक्रमात अनिता संदिप कल्हाटकर ह्या विजेत्या ठरल्या.
या अनोख्या उपक्रमात माळीनगरमधील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेऊन मनसोक्त आनंद घेतला. यामध्ये माधुरी मोरे यांनी दुसरा तर हिना गुप्ता यांनी तिसरा क्रमांक पटकावला. वैशाली म्हाळसकर ह्या लकी ड्रॉ च्या विजेत्या ठरल्या. नगरसेविका अर्चना म्हाळसकर, सुनिता भिलारे, श्रीधर चव्हाण, उद्योजक सुनिल येवले, किरण भिलारे, नामदेव वारींगे, कल्पेश भोंडवे, रविंद्र म्हाळसकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.  
कार्यक्रमाचे संयोजन स्नेहल औटी, सीमा ढोरे, रोहिनी पवार, निलम म्हाळसकर, दिपाली सुतार, किरण आगळे, ज्योती शिंदे, निलम दिवाडकर यांनी केले. सुत्रसंचालन नीता चोरडीया यांनी केले. सपना म्हाळसकर यांनी आभार  मानले.

error: Content is protected !!