वडगाव मावळ: सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड या ऊसशेतीसाठी आवश्यक असलेल्या प्रमुख घटकांची नोंद ठेवणे तसेच मातीतील सहा अन्नद्रव्य घटकांची माहिती थेट आपल्या मोबाईलवर देणाऱ्या एआय तंत्रज्ञानामुळे ऊस शेती अधिक फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राची विभागाचे प्रमुख तुषार जाधव यांनी  व्यक्त केला.
मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, प्रगतीशील शेतकरी सुरेश चिंचवडे, माजी सरपंच बबनराव ठुले तसेच कारखान्याचे अन्य संचालक वर्ग व तालुक्यातील शेतकरी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी चिंचवडे यांच्या ऊस शेतीमध्ये या तंत्रज्ञानाची उभारणी करून पूजन करण्यात आले.
जाधव म्हणाले, महाराष्ट्रातील पहिल्या पायलट प्रकल्पाची सुरुवात मळवंडी ठुले या गावापासून होत असून पाणी आणि खतांचे प्रमाण सांगण्याबरोबरच मातीच्या आरोग्यावर काम करणारे एआय तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी प्रोजेक्टरच्या साह्याने हे तंत्रज्ञान नेमके कसे काम करते हे दाखविण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. बापू भेगडे यांनीही, कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाची  माहिती देण्यात येईल अशी घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज भोईर यांनी केले तर सुरेश चिंचवडे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!