
मावळ:हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची या वर्षाची शैक्षणिक सहल कोकण दर्शनाने झाली. छात्र अद्यापकांनी प्रतापगड, महाडचे चवदार तळे या ऐतिहासिक स्थळाना भेट देऊन माहिती घेतली.
महाबळेश्वर मंदिर दर्शन, दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध हरहरेश्वर मंदिर दर्शन आणि दिवे आगर येथील सुवर्ण गणेशाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर दिवेअगार येथील बीचचा आनंद लुटला. यावेळी प्राचार्य हिरामण लंघे यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख राजेंद्र डोके यांनी सहलीचे सुंदर नियोजन केले.
डॉ. मनोज गायकवाड, शुभांगी हेद्रे, शीतल गवई, नंदकिशोर व सोमनाथ धोंगडे यांनी सहल यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवाले, सचिव अशोक बाफना आणि सर्व संचालकांनी शिक्षकांचे व छात्र शिक्षकांचे कौतुक केले.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ


