
मंगळवारी २१ जानेवारीला राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव
पिंपरी : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, आशिया मानवशक्ती विकास संस्था आणि गणेश इंटरनॅशनल स्कूल यांनी मंगळवार, दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी ३२ व्या राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सवाचे गणेश इंटरनॅशनल स्कूल, नेवाळेवस्ती, चिखली येथे सकाळी ठीक १०:०० वाजता आयोजन केले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून ज्येष्ठ कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ हे अध्यक्षस्थान भूषवतील; तर एस. बी. पाटील स्वागतप्रमुख आहेत. संगीतकार आनंद माडगूळकर यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ कविवर्य अशोक नायगावकर यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात येईल.
त्याचबरोबर कालिका बापट (गदिमा काव्यसाधना पुरस्कार), संगीता सूर्यवंशी (गदिमा लोककला पुरस्कार), राजन लाखे (गदिमा शब्दप्रतिभा पुरस्कार), अनंत राऊत (गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार), देवा झिंजाड आणि समीर गायकवाड यांना अनुक्रमे ‘एक भाकर तीन चुली’ आणि ‘खुलूस’ या कादंबर्यांसाठी मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ (मृत्युंजय साहित्य पुरस्कार) तसेच राजेश गायकवाड (‘बिन चेहर्याच्या कविता’), आनंद पेंढारकर (‘मी एक बोन्साय’), संदीप काळे (‘सईच्या कविता’), माधुरी विधाटे (‘मल्हारधून’), मीना शिंदे (‘दीवान – ए – मीना’), निरुपमा महाजन (‘शांत गहिर्या तळाशी’) यांना कवितासंग्रहासाठी गदिमा साहित्य पुरस्कार आणि गणेश भाकरे यांना (‘थेंबा थेंबाची कहाणी’) गदिमा बालकाव्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येईल.
गदिमा दिवाळी अंक पारितोषिकासाठी अधोरेखित (प्रथम) आणि हंसा (द्वितीय) या अंकांच्या संपादिका डॉ. पल्लवी बनसोडे आणि प्रिया कालिका बापट यांना सन्मानित केले जाणार आहे. काव्यमहोत्सवात शोभा जोशी, प्रतिमा काळे, रशीद अत्तार, देवेंद्र गावंडे आणि सुरेश वाघचौरे यांना गदिमांचे वारसदार कवी म्हणून सन्मानित केले जाईल. नि:शुल्क असलेल्या या काव्यमहोत्सवात रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदाम भोरे आणि निमंत्रक श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी केले आहे.
- मावळ तालुक्याच्या विकास कामांसंदर्भात आमदार सुनील शेळके यांची पीएमआरडीए आयुक्तांसोबत बैठक
- वणवे व वन्यप्राण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती :वनविभाग शिरोता व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचा पुढाकार
- भामाबाई महादू सातकर यांचे निधन
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


