तळेगाव दाभाडे: नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च तसेच नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आयोजित ‘स्पेस ऑन व्हील्स’ हे अनोखे प्रदर्शन महाविद्यालयामध्ये नेकतेच संपन्न झाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो ) या संस्थेशी करार असलेली नागपूर येथील विदर्भ प्रदेश मंडळाच्या विज्ञान भारती (विभा ) या संस्थेमार्फत हे प्रदर्शन घेण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये इसरोच्या पहिल्या दोन प्रक्षेपण पॅड्सची मॉडेल, चंद्रयान-१, भारतीय मंडळ भारतीय मंगळ ओर्बिटल मिशन (मंगलयान), भारतीय रिमोट सेन्सिंग अनुप्रयोग, चंद्राची पृष्ठभाग ज्यामध्ये अंतराळवीर आणि चंद्रयान २ स्पेसक्राफ्टचे चित्रण, इसरोच्या सर्व प्रेक्षेपण वाहनांचे मॉडेल एसएलवी३, एएसएलवी, पीएसएलवी, जीएसएलवी, एमके ३, आरएलवी टीडी, क्रू एस्केप सिस्टम आणि हीट शील्ड मॉडेल अशा अनेक मॉडेलचे प्रदर्शन या मध्ये दाखवण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्धिष्ट म्हणजे भारताच्या वैज्ञानिक विकासाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत होणे, विद्यार्थ्यांना आणि समाजाला शिक्षित करणे आणि प्रेरित करणे, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी भारतीय अंतराळ संशोधनाची माहिती प्रसारित करणे.
कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग प्रमुख डॉ. सागर शिंदे, विज्ञान भारतीच्या राष्ट्रीय गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्य डॉ. मानसी मालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टीफन म्हेत्रे, शंतनू शिंदे, प्रणव नरवडे, प्रथमेश कुदळे, प्रिया राम, तनुश्री बेहरा, मीनल शेलार, शितल कालेकर, सानिका बारगुजे, श्वेता पादीर, श्रद्धा धनवटे, वर्षा सोनवणे,अमेय लोहार या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पहिले.अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस.एन. सपली व डॉ. अपर्णा पांडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
- आमदार सुनिल शेळके यांना मंत्रीमंडळात संधी द्यावी :नाणोलीकरांचे फिरंगाई मातेला साकडे
- बाळासाहेब ढोरे यांचे निधन
- शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात शाळांनी सहभागी व्हावे: राजेश गायकवाड
- विद्या प्रसारिणी सभेचा प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट प्रकल्प पुरस्काराने श्री.बाळासाहेब खेडकर सन्मानित
- कान्हेत दिव्यांग दिन उत्साहात साजरा