पवनानगर: शनिवार ता.२३ला महागाव येथे कालाष्टमी व श्री काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी पहाटे ५ ते ७ वा. पर्यंत काकडा आरती व दिपोत्सव सकाळी ८ वा. देवाचा अभिषेक , दु. ३ ते ४.३० पर्यंत ताटांची भव्य मिरवणूक, सायं. ५ ते ६ वा. ह.भ.प. गबळू महाराज घारे (महागांव) यांचे प्रवचन होईल.सायं. ६ ते ७ वा. हरिपाठ व रात्री. ७ ते ९ वा.किर्तनकेसरी. ह.भ.प. सुखदेव महाराज ननवरे (अहमदनगर) यांचे सुश्राव्य किर्तन होईल.रात्री ९ ते १० वा. महाप्रसाद होईल.
सोहळ्याचे हे १६ वे वर्ष आहे.रात्री १० नंतर व समस्त ग्रामस्थ मंडळी, महागांव पवन मावळ वारकरी सांप्रदाय (पंचक्रोशी) यांचा सामुदायिक हरिजागर होईल.
श्री राम सेवा तरूण मंडळ (महागांव), श्री भैरवनाथ तरूण मंडळ (महागांव), श्री गुरूदत्त तरूण मंडळ (वृत्तवाडी), श्री हनुमान तरूण मंडळ, निकमवाडी समस्त ग्रामस्थ मंडळी, महागांव, दत्तवाडी, निकमवाडी, सावंतवाडी, प्रभाचीवाडी, धालेवाडी, मालेवाडी कार्यक्रमांसाठी परिश्रम घेत आहेत.

error: Content is protected !!