पिंपरी : गझलपुष्प कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेचा सहावा वर्धापनदिन सोहळा रविवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी ४:३० या वेळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे, पिंपरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ गझलकार डॉ. शिवाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्‍या या सोहळ्याचे उद्घाटन भाजपा मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या हस्ते होणार असून उद्योजक संजॉय चौधरी आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
सोहळ्यात ज्येष्ठ गझलकार बदीऊज्जमा बिराजदार उर्फ साबीर सोलापुरी यांना गझलपुष्प पुरस्कार २०२४ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असून नीलेश शेंबेकर लिखित ‘क्षितिजापल्याड’ आणि संदीप कळंबे लिखित ‘मौनातल्या विजा’ या गझलसंग्रहांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल; तसेच सुमारे तीन गझल मुशायर्‍यांमधून एकूण पंचवीस गझलकार सहभागी होणार असून ‘गझलगुज’ या कार्यक्रमांतर्गत जयेश पवार यांच्या सोलो गझल सादरीकरणाने सोहळ्याची सांगता करण्यात येईल. नि:शुल्क असलेल्या या सोहळ्याचा लाभ सर्व रसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन गझलपुष्पच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!